वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारी ; चुरस वाढली

0
265

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: वकीलांची संघटना समजल्या जाणाऱ्या वकील संघाची निवडणूक येत्या 12 फेब्रुवारीला होऊ घातली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव पदासाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या तीनही पदासाठी सध्या नामांकन अर्ज दाखल करणे सुरू आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख 9 फेब्रुवारी आहे. या निवडणुकीत 1194 वकील हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी पुरुष वकील मतदार 944 आहेत तर 250 महिला वकील मतदार आहेत. आतापासूनच न्यायालय परिसरात उमेदवार असलेल्या वकिलांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दिवशीच म्हणजे 12 फेब्रुवारीला लागणार आहे. अकोला वकील संघाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते.

Advertisements
Previous articleलोणार सरोवराच्या विकासासाठी नियोजित आराखडा तयार करा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleफ्रंटलाईनमध्ये पत्रकारांनाही कोरोना लस द्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here