फ्रंटलाईनमध्ये पत्रकारांनाही कोरोना लस द्या..

0
152

मराठी पत्रकार परिषद व टिव्ही जर्नालिस्ट संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

लोणार: कोरोना काळामध्ये कर्मचारी सोबत काम करणाऱ्या पत्रकारांनाही फ्रंटलाईनमध्ये समावेश करून त्यांना कोरोना लस देण्यात यावी व कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाखाचा विमा देण्यात यावा, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद तथा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी लोणार येथे आले असता, सरोवरकाठी वृत्तांकनासाठी उपस्थित पत्रकारांनी त्यांना निवेदन दिले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष वसीम शेख, युवराज वाघ, अजय बिलारी, सिध्दार्थ आराख, कासिम शेख, दिपक मोरे, संदीप शुक्ला, गणेश सोळंकी, संजय जाधव, सिध्देश्वर पवार, नितीन कानडजे, निलेश राऊत हजर होते.
कोरोना काळामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी कार्यरत होते, यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारसुद्धा समाजामध्ये जनजागृतीचे काम करत होते. त्यांचा समावेश सुद्धा कोरोना लसीकरण करताना प्रंâटलाईन कर्मचारी म्हणून करण्यात यावा व सर्व पत्रकार बांधवांनाही लस देण्यात यावी. सोबतच कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विमा निधीतून ५० लाख देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

Advertisements
Previous articleवकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारी ; चुरस वाढली
Next articleपरिक्षेबाबत कुलगुरु करणार 2 वाजता मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here