परिक्षेबाबत कुलगुरु करणार 2 वाजता मार्गदर्शन

0
77

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ परीक्षेची पद्धती आणि ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया याबाबत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर
आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख हे सर्व विद्यार्थ्यांना युट्युब लाईव्हद्वारे आज दि 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता live संवाद साधणार आहेत.
परीक्षा अर्ज भरण्याच्या पद्धतीचा डेमो दाखविणार आहेत. यामध्ये ऑनलाईन परीक्षा अर्ज, नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाणार आहे. सर्व प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी या माहितीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
युट्युब लाईव्ह बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

असे आवाहन कुलसचिव,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here