पोलिस भरतीसाठी प्रयत्नात असलेल्या 22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
204

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 

सिंदखेडराजा :पोलिस भरतीसाठी प्रयत्नात असलेल्या एका 22 वर्षीय युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना तालुक्यातील कंडारी येथे 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.
तालुक्यातील कंडारी येथील संदीप नारायण जायभाये हा युवक 5 फेब्रुवारी रोजी चप्पल आणायची आहे म्हणून आईकडून पैसे घेऊन घराबाहेर पडला. मात्र दिवसभर तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिवसभर त्याचा शोध घेतला. दरम्यान सायंकाळच्या सुमारास संदीप जायभाये हा गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेलाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश सानप व मृतकाचा भाऊ गैबीनाथ नारायण जायभाये यांनी साखरखेर्डा पोलिसांना दिली. ठाणेदार जितेंद्र आडोळे, पीएसआय दीपक राणे, प्रकाश मुंढे, सूरजसिंग इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे रवाना केला. दरम्यान ७ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements
Previous articleकाय सांगता.. पीएम किसान स्कीमशी किसान क्रेडीट योजना झाली लिंक
Next article45 हजाराची लाच मागणारा नगर रचना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here