45 हजाराची लाच मागणारा नगर रचना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0
137

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

वाशीम: घराचे व दुकानची बांधकाम परवानगी देण्यासाठी 45 हजार रुपयांची लाचेची मागणी करणारा मंगरुळपीर नगर परिषदेचा रचना सहाय्यक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागने 8 फेब्रुवारी रोजी केली असून नितेश ओमप्रकाश चौरसिया असे आरोपी अधिकार्‍याचे नाव आहे.
मंंगरुळपीर शहरातील व्यक्तीने वाशीम एसीबीकडे तक्रार दिली होती की, मंगरूळपीर नगर पालिकेकडे तक्रारदाराने घराचे व दुकान बांधकामासाठी परवानगी मागीतली होती. या मोबदल्यात नगर पालिकेत कार्यरत रचना सहाय्यक अधिकारी वर्ग-2 नितेश चौरसिया यांनी 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने 25 व 27 जानेवारी रोजी पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 फेब्रुवारी रोजी सापळा रचला असता आरोपील संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेण्याचे टाळले. एसीबीच्या पथकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी चौरसिया याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.सदर कारवाई पोलिस अधीक्षक, विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक एस.व्ही.शेळके यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एन.बी.बोराडे, नितीन टवलारकर, अरविंद राठोड, शेख नावेद या पथकाने केली आहे.

 

Advertisements
Previous articleपोलिस भरतीसाठी प्रयत्नात असलेल्या 22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleचुलत मामानेच केला मुलीचा विनयभंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here