आमदारपुत्राला राज्यातील दुसऱ्या शिवतीर्थाचा सन्मान !

0
133

प्रशांत खंडारे @
व-हाड दूत न्युज नेटवर्क

बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचेच सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रुंदावलेल्या कक्षा आणि त्यांच्या समाजकार्यातील योगदानाबद्दल राज्यातील दुसरे शिवतीर्थ समजल्या जाणाऱ्या आणि शिव विचारांचे गाव अशी ओळख ल्यालेल्या सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजाराच्यावतीने युवा गौरव पुरस्कार १८ फेब्रूवारीला बहाल करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या राजराजेश्र्वर मंदीरानंतर जळकी बाजारचे शिवतीर्थ मंदीर सर्वदूर परीचीत आहे. आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांना हा गौरव प्राप्त झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements
Previous articleरेल रोखो आंदोलनाच्या भितीने स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना अटक
Next articleअनुभवलेल्या कथा हया अधिक सकस असतात: चंद्रशेखर पांडे गुरुजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here