*सुहास तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने केली काळ्या गव्हाची लागवड*

0
118
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोट : तालुक्यातील आकोलखेड येथील सुहासआप्पा तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने आपल्या दीड एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड केली आहे.काळ्या गव्हाची लागवड राजस्थान,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे.सुहास तेल्हारकर यांनी काळ्या गव्हाचे बी राजस्थान येथून आॅनलाईन बोलावून आपल्या शेतात ४० किलो बी दीड एकर क्षेत्रावर काळ्या गव्हाची पेरणी केली आहे.काळ्या गव्हावर मावा,तुडतुडे येत नाहीत.काळ्या गव्हाच्या जमिनीखाली असलेल्या बुंद्याला नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही.काळ्या गव्हामुळे रक्तदाब,मधुमेह,रक्तपेशी,कॅन्सर,ह्रदयरोग या रोगाच्या उपचारासाठी गुणकारी आहे.काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च हा सामान्य गव्हापेक्षा कमी आहे.काळ्या गव्हासाठी एकरी ७ ते ८ हजार रुपये खर्च असून त्यावर कुठलाही रासायनिक फवारा मारण्याची सुध्दा आवश्यकता नाही.काळ्या गव्हाच्या एका बुंद्याला ९ ते १० उंबया येतात ते सामान्य गव्हापेक्षा जास्त आहेत.गहू हा काळा असून सामान्य गव्हाप्रमाणे तो हिरवा असतो.सुहासआप्पा तेल्हारकर यांना दीड एकर शेतात अंदाजे २० ते २५ क्विंटल प्रति एकर होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे सुहासआप्पा तेल्हारकर यांचा आदर्श घेऊन इतरही शेतकर्‍यांनी काळ्या गव्हाची लागवड केल्यास शेतकर्‍याला चांगले दिवस येतील यात कोणतीही शंका नाही.
सुहासआप्पा तेल्हारकर यांनी केलेली काळ्या गव्हाची लागवड ही शेतकर्‍यांना बी उपलब्ध करून देण्यासाठी केली असून याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी प्रयोग करावा तो यशस्वी होईल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here