पळशी बु. येथे युवकाचा मृतदेह आढळला!

0
135

खामगाव: तालुक्यातील पळशी बु. येथे उमेश रमेश मानकर (वय ३५) या युवकाचा मृतदेह गावाजवळील नाल्यात आढळून आला.
उमेश आज दुपारी तो घराबाहेर पडला होता. दुपारपासून तो घरी आला नाही म्हणून कुटूंबियांनी शोध घेतला मात्र तो दिसून आला नाही. शेवटी त्याचा मृतदेह गावाजवळील म.फुले शाळेच्या पाठीमागील नाल्यात काही नागरिकांना संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. याबाबत त्यांनी कुटूंबीयांना माहिती दिली. उमेशचे वडील रमेश मानकर खामगाव ग्रामिण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. उमेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Advertisements
Previous articleबच्चूभाऊ! एखादा ‘स्टंट’ लोकांना वाचविण्यासाठीही कराल का?
Next articleकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here