तलवारी हातात घेवून केला डान्स, न.प.उपाध्यक्षाचा वाढदिवस केला साजरा

0
665

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मलकापूर: काँग्रेसचे न.प.उपाध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्‍यांच्‍या समर्थकांनी खुलेआम शहरात तलवारी मिरवित डान्स केला. याप्रकाराचा व्‍हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीसांनी तातडीने कारवाई करत दोघांना गजाआड केले व पाच तलवारी जप्‍त केल्‍या आहेत.
वाढदिवशी काहीतरी वेगळे करत प्रसिद्धी मिळविण्यासाठी नवनव्या युक्ति शोधल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा सपाटा सुरु आहे. यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी आणि चाकूचा वापर सर्रास वाढला आहे. याचीच पुनरावृत्ती करत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र वारंवार अशा प्रकारचे स्टंट पाहून नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखत्या तलवारी हवेत फिरविल्याचे चे व्हिडीओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. मलकापूर शहरातील नगर पालिकेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी तलवारी हवेत फिरविल्या ऐवढेच नव्हे तर विविध प्रकारचे नारे ही यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली. मलकापूर शहर मागील काही दिवसांपासून संवेदनशील होत चाललेले असल्‍याचे मागील काही घटनांवरुन दिसून येते. अशातच रात्री तलवारी निघाल्याने नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दुसरीकडे सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने डि.बी.पथकातील पोलिसांनी दखल घेत रात्री उशिरा दोघा युवकांना अटक करून त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleपोलिस पाटलाने झाडली बालकावर गोळी
Next articleमहिलेची गळफास घेवून आत्‍महत्‍या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here