महिलेची गळफास घेवून आत्‍महत्‍या

0
85

व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: महिलेने राहत्‍या घरी साडीच्‍या सहाय्याने गळफास लावून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना तालुक्‍यातील पारखेड येथे उघडकीस आली.
शहरापासून जवळच असलेल्‍या पारखेड येथील रहिवासी संगीता पुंडलिक पुराणे वय ४० या महिलेने  ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दरम्‍यान घरी कोणी नसताना घरातील टिनपत्र्याच्‍या छताच्‍या लोखंडी अँगलला साडीच्‍या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदर प्रकार काही वेळानंतर सुनिल पांडुरंग पुराणे वय २८ या युवकास दिसून आली. याबाबत त्‍याने घराजवळ आरडाओरड करुन नातेवाईकांना सांगितले तसेच घटनेची माहिती ग्रामीण पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्‍थळी पोहचून मृतक संगीता पुराणेचा मृतदेह ताब्‍यात घेवून पंचनामा केला. तसेच सुनिल पांडुरंग पुराणे यांच्‍या फिर्यादीवरुन कलम १७४ जा. फौ. नुसार गुन्‍हा दाखल केला. मृतकाने आत्‍महत्‍या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here