दादा, भाऊ .. मास्क लावा हो.. खडसे साहेबांच्या गांधीगिरीची चर्चा

0
306

अकोल्यात विनामास्क वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत  असल्याने अखेर प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रस्त्यावर उभे राहून नागरिकांना दादा, भाऊ म्हणत हात जोडून मास्क लावण्याबाबत विनंती केली. साहेबांच्या या गांधीगिरीची शहरातच नव्हे तर जिल्हयात दिवसभर चर्चा सुरु होती.

पोलिसांच्या मदतीने शहरातील प्रत्येक चौकात मास्क न लावता फिरणा-या लोकांवर गुरुवारी दिवसभर कारवाई करण्यात आली. ही कारवाईची मोहिम जिल्हाभर राबवण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.

‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम
जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. त्याचे गाभीर्य ओळखून कोविड-19 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचा काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक मोहिम राबवून शहरातील विविध ठिकाणी भेट देण्यात आली. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन  करुन आवाहन केले. यामोहिमेत त्याच्यासोबत उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखडें, नायब तहसिलदार मेहेंद्र आकराम, पोलिस निरिक्षक उत्तमराव जाधव, परिवहन नियंत्रक विभागाचे शेळके, महसूल व महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी  सहभागी होते.

152 व्यक्तीविरुद्ध कारवाई
नागरीक बिना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिम राबवून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही  करण्यात आली. त्यात अकोला तहसिल कार्यालया येथे 63, बार्शीटाकळी येथे 14, मुर्तिजापूर येथे आठ, पातुर येथे चार, अकोट येथे  31, बाळापूर येथे 22, तर तेल्हारा येथे 10 असे एकूण 152 व्यक्तीकडून 30 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

Advertisements
Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात राज्य सरकारच्या अडचणी
Next article‘त्या’च्या मुळेच तिची आत्महत्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here