राज्यातील सिनिअर आयएएस अधिका-यांच्या बदल्या

0
157

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील अधिका-यांचा समावेश आहे.

(1) श्री एस चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर

(2) श्री श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर

(3) श्री राजेश पी पाटील (Odissa Cadre) आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर

(4) श्रीमती शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर

(5) श्रीमती प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर

(6) श्रीमती अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर

(7) श्री एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here