कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवा: विभागीय आयुक्तांचे निर्देश

0
180

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनाबाबत आज विभागीय आयुक्त यांनी आढावा घेतला. कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन मास्क वापर, सामाजिक अंतर व हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचा काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच कोविड रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित बैठकीस ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपाचे आयुक्त निमा अरोरा, पोलीस आयुक्त जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक श्यामकुमार सिरसाम, मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला. होम आयसोलेशनमधे असलेले व्यक्तीकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशाकडून संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता असते अशा व्यक्तीवर आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच होम आसोलेशन करताना त्याच्याकडे स्वतंत्र्य व्यवस्था आहे याची खातरजमा करुनच त्यांना होम आयसोलेशन करावे.
मागील काहि दिवसात जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्ण संख़्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन कोरोना रुग्णाचा शोध घेवून त्याला थोपविण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील शोध घ्यावा. यासाठी विशेष मोहिम राबवून आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढविण्याचे सूचना त्यांनी दिल्यात. अक्टीव्ह रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना काटेकोरपणे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी संबंधिताना दिल्यात. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेवून लसीकरणाची गती वाढवून लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करुन लसीकरण मोहिम यशस्वी करण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

Advertisements
Previous articleराज्यातील सिनिअर आयएएस अधिका-यांच्या बदल्या
Next articleएवढी हिंमत, ठाणेदाराचेच फेसबुक हायजॅक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here