एवढी हिंमत, ठाणेदाराचेच फेसबुक हायजॅक

0
210

अकोला: जिल्ह्यातील बडे राजकीय नेते व पदाधिकारी यांच्यानंतर आता पोलिस प्रशासनातील बडे अधिकारी असलेले ठाणेदार यांचे सोशल मीडिया वरील फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आल्याने सोशल मीडिया यूजर्समध्ये खळबळ उडाली आहे.
सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत.
सामान्य युजर्ससह काही बड्या व्यक्तींचे फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार यापूर्वी घडले. काही दिवसांपूर्वी एका बड्या राजकीय नेत्याचे आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून विविध कारणे देऊन फ्रेंड लिस्ट मधील लोकांकडे पैशांची मागणी केल्याची माहिती समोर आली होती.
आता चक्क ठाणेदाराचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले.
पिंजरचे ठाणेदार महादेव पडघन यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ठाणेदार महादेव पडघन यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रकाराबाबत सर्वांना सूचना देऊन आपल्या अकाउंट वरून कोणतीही फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, तसेच पैशांची मागणी झाल्यास त्याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले आहे.
बडे राजकीय नेते आणि पदाधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील बडे अधिकारी यांचे अकाऊंट हॅक होऊ शकते तर सामान्य युजर्सनी आपले सोशल मीडिया अकाउंट वापरताना गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे.

Advertisements
Previous articleकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवा: विभागीय आयुक्तांचे निर्देश
Next articleएम.आय.डी.सी.साठी जागा निश्चित करून तत्काळ अहवाल पाठवा: आमदार राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here