काटेपूर्णा प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी ना. संजय धोत्रेे यांचा पुढाकार

0
330

जलशक्ती मंत्रालयाकडे निधीची मागणी 
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: काटेपूर्णा प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नामदार गजेंद्र शेखावत यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्याला वरदान असलेला काटेपुर्णा प्रकल्प ५० वर्षापेक्षा अधिक जुना झाला असल्याने पाणी वितरण प्रणाली सक्षम करण्यासाठी कालव्यांचे जाळे मजबूत करणे गरजेचे झालेले आहे. प्रकल्पावर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ३२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या कसे सक्षम करता येईल या सर्व बाबींचा काटेपुर्णा प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावास विचार करण्यात आला असून प्रस्तावाची किंमत सुमारे ४० कोटी रुपये इतकी आहे. या अधुनिकरणाच्या प्रस्तावासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जाल्शक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री ना. गजेंद्र शेखावत यांना प्रस्ताव निधी मंजुरीसाठी पत्राद्वारे मागणी केली आहे. काटेपुर्णा प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावात जुने झालेले कालवे पुन:स्थापित करणे, कालव्यावरील गेट दुरुस्ती व नवीन बांधणे, कालव्यातून पाझरून जाणाऱ्या पाणी नाशाचे प्रमाण कमी करण्यासाठी कालव्याला सिमेंटचे अस्तरीकरण करणे, पाणी नाश कमी करणे, वाहून जाणारे पाणी लाभ क्षेत्रातील असलेल्या नाल्यांवर अडवून सिमेंट नाला बांधणे त्यामुळे पाणी पूर्णा नदीमध्ये वाहून न जाता लाभक्षेत्रात अतिरिक्त पाणी साठविले जाईल व त्याचा वापर शेती आणि  उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होईल. या  योजनेमुळे कालव्यांची कार्यक्षमता दुपटीने वाढेल त्यामुळे लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे सहज शक्य होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here