वनमंत्री संजय राठोड अज्ञातवासात

0
281

व-हाड दूत न्युज नेटवर्क
यवतमाळ: चित्रा वाघ यांच्या थेट आरोपानंतर प्रसारमाध्यमांनी वनमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या तीन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. त्यामुळे राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे. या सर्व प्रकरणानंतर सरकारवरचा दबाव वाढत आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांचे पदही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
नेमकं प्रकरणं काय?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here