अकोल्यात शेतकरी महापंचायत; चौधरी राकेश टिकैत उपस्थित राहणार

0
145

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: देशातील शेतक-यांच्या असंतोषाचे प्रेरक चौधरी राकेश टिकैत, चौधरी युद्धवीर सिंह यांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता खुले नाट्यगृहात शेतकरी महापंचायतचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
राकेश टिकैत यांची अकोल्यातील सभा महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला आयाम देणारी ठरेल असा विश्वास प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केला. कोविडची स्थिती लक्षात घेऊन आयोजन करण्यात येत आहे, असे सांगून ते म्हणाले, शेतकरी जागर मंचने चार साडेचार महिन्यात यापूर्वी चार टप्प्यात आंदोलन केले आणि आंदोलनाचा पाचवा टप्पा सभा राहणार आहे, असे सांगितले.
यावेळी डॉ. विजय जाधव, विजय देशमुख, काझी लायक अली, बाळासाहेब ढगे, दिलीप मोहोड, सै. वासीम, निलेश चतरकर, दिवाकर गवई, श्याम मनतकार, केदार बकाल, मंगेश मांगटे, सुरेश राऊत, प्रमोद धर्माळे, डॉ. ऐकाम देशमुख, वासुदेवराव गोळे, चंद्रमणी वाहुरवाघ उपस्थित होते.
अकोल्यातून देणार दिशा
शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावे यासाठी संयुक्त किसान मोर्चाने अकोल्यातून आंदोलनाला दिशा देण्याचे ठरवले आहे. किसान कैफियत महापंचायतीला माजी खा. राजू शेट्टी प्रणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, आ. किरण सरनाईक प्रणित विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अ. भा. मराठा महासंघ यांचा आयोजनात सहभाग राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisements
Previous articleशिवजयंती साधेपणाने साजरी करावी: डॉ. राजेंद्र शिंगणे
Next articleडॉ.केशव हेडगेवार संस्‍थेच्‍या वतीने रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत चर्चासत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here