डॉ.केशव हेडगेवार संस्‍थेच्‍या वतीने रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत चर्चासत्र

0
118

व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: तालुक्‍यातील पळशी बु. येथील महात्‍मा फुले मंगल कार्यालयात सडक परिवहन आणि राज्‍य मार्ग भारत सरकार महाराष्ट्र परिवहन विभाग आणि डॉ.केशवराव हेडगेवार बहुउद्देशिय सेवाभावी संस्‍था रायगाव ता. लोणार यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३२ वे रस्‍ते सुरुक्षा अभियानांतर्गत एकदिवसीय चर्चा सत्र नुकतेच पार पडले.
१२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्‍या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी महात्‍मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार होते. यावेळी महात्‍मा फुले विद्यालयाचे प्राचार्य जुमळे, डाॅ. एन.एस. नारखेडे, डॉ.ए.एस.तिडके, मोहन कुळकर्णी यांची प्रमुख उपस्‍थिती होती. याप्रसंगी उपस्‍थितांना वाहतूकीचे नियम होणारे अपघात, कायद्याचे पालन कसे करावे या सदंर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्‍येक शाळेमध्ये राबवावे असे आवाहन डॉ. धनोकार यांनी अध्यक्षीय भाषणात केले. या चर्चा सत्राला महात्‍मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थींनी गावातील युवक युवती प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. यावेळी सरपंच सुधाकर पल्‍हाडे, रामेश्वर दहातोंडे, सुरेश सांगळे, बाळासाहेब कांबळे, सौ. प्रियंका कुळकर्णी, रामराव घुगे, खुशाल नागरे आदिंची उपस्‍थिती होती. चर्चासत्राचे प्रास्‍ताविक गणेश मुळे यांनी केले. संचालन महात्‍मा फुले विद्यालय हिंगणा येथील मुख्याध्यापक सुनिल देशमुख, तर आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले लाखनवाडा येथील अध्यक्षा सौ. शितल माेताळकर यांनी केले.

Advertisements
Previous articleअकोल्यात शेतकरी महापंचायत; चौधरी राकेश टिकैत उपस्थित राहणार
Next articleअरे बापरे.. कार विहिरीत काेसळून मायलेकीचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here