अरे बापरे.. कार विहिरीत काेसळून मायलेकीचा मृत्यू

0
171

जालन्याजवळ अपघात, 3 बचावले
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: जालना ते देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास कार कोसळून मायलेकीचा मृत्यू झाला तर तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
या विहिरीत दोन दिवसापूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त वाशीम जिल्ह्यातील असून ते औरंगाबाद येथील काम आटोपून सकाळी परत निघाले होते. एका ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यापासून दहा फूट असणा-या विहिरीत कोसळली. कार बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. घटनास्थळ हे जालन्यालगत असलेल्या जामवाडी शिवारात आहे. या अपघातात वाशीम जिल्ह्यातील शिंगडोह, देवठाणा ता. मानोरा येथील आरती गोपाळ फादडे (30) आणि तिच्या चार वर्षीय माही या मुलीचा बुडून मृत्यू झाला. गोपाळ विठ्ठल फादडे (35), वेदिका फादडे (दीड वर्ष) आणि जय वानखेडे (17) या तिघांना ग्रामस्थांनी सुखरूपपणे बाहेर काढले.

Advertisements
Previous articleडॉ.केशव हेडगेवार संस्‍थेच्‍या वतीने रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत चर्चासत्र
Next articleशकुंतलेला ब्रिटीश क्रिस्टल करारातून मुक्त करा – खा. भावनाताई गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here