जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत सक्तीच्या रजेवर

0
346

बुलडाणा: एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु झाली आहे. आणि त्यातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील काही अधिकाºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुरेश घोलप यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Advertisements
Previous article१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान जनता कर्फ्यु – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
Next articleनगराध्यक्ष अॅड हरीश रावळांची शहरात युध्दस्तरावर सॅनिटायझर फवारणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here