नगराध्यक्ष अॅड हरीश रावळांची शहरात युध्दस्तरावर सॅनिटायझर फवारणी

0
84

मलकापुर: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी त्यांनी शहरातील विविध भागात सॅनिटायझर फवारणी करून कर्मचाºयांचा उत्साह वाढवला.
मलकापुर शहरातही रुग्ण वाढले असुन अनेक जण दगावल्याने न.प. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा युध्दस्तरावर कंबर कसली असुन शहरातील प्रत्येक नगरात, गल्लीबोळात, सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, तहसील चौक, हनुमान चौक, बसस्थानक परिसरासह जुन्या गावात स्वत: नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळांनी सॅनीटायझर ची फवारणीचे कार्य सुरू केले आहे.
नगरपालिका अग्नीशामक दलाच्या टँकमध्ये सॅनीटायझर टाकुन उच्च दाबाचे फवारणीतुन अ‍ॅड रावळ, अग्नीशामक दलाचे कर्मचारी हि फवारणी करीत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी नागरीकांनी मास्कचा वापर करावा, जरुरी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांनी जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here