अकोल्यात कोरोनाचे 342 बळी

0
216

पुन्हा कोरोनाचा कहर वाढला
अकोला : कोरोना व्हायरसच्या दहशतीतून शहर तथा जिल्हा अद्यापही बाहेर निघालेला नाही. सर्वोपचार रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या 342 वर पोहचली आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 12,400 च्या जवळ पोहचली आहे. यापैकी 954 अँक्टीव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. अँक्टीव्ह रुग्णांची संख्या पाहता नागरिक चिंतातूर होणे स्वाभाविक आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच, आता विपरित परिस्थिती आली आहे. दररोज ठणठणीत झालेल्या रुग्णांना कोविड केंद्रातून सुटी देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात कोविड मुळे मृत्युमुखी पडणा-या 342 जणांची संख्या चिंतेचा विषय आहे.

Advertisements
Previous articleअकोल्यात २८ फेब्रुवारीपर्यंत जमाव बंदी, शाळा, महाविद्यालयही राहणार बंद
Next articleतुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here