अकोल्यात पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

0
92

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: भारतीय हवामान विज्ञान संस्थेच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार अकोला जिल्ह्यात दि.१६ ते १८ दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मेघ गर्जना व विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तरी याबाबत गावपातळीवरील नागरिकांना आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य कर्मचारी या साऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबावे व दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here