बुलडाण्यातही कोरोनाचा उद्रेक, जिल्हाधिका-यांनी दिला कारवाईचा इशारा

0
262

व-हाड न्युज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचा उद्रेक आता पुन्हा जिल्ह्यात फोफावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझीटीव्ह रूग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यात यावे, त्रिसूत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासह विनामास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, या त्रिसुत्रीचे पानल न करणा-यांवर दंडात्मक कारवाइ करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिल्या.
कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleअकोल्यात पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा
Next articleपालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटीव्ह; प्रकृती चांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here