पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटीव्ह; प्रकृती चांगली

0
156

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
डॉ. शिंगणे 12 व 13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यामध्ये होते. त्यावेळी अनेकजण साहेबांच्या संपर्कात आले आहे. तरी साहेबांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन साहेबांनी केले आहे. लवकरच कोरोनावर मात करून साहेब पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होतील, अशी माहिती पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here