अखेर बुलडाण्यात संचारबंदी लागू… शाळा महाविद्यालय बंद

0
176

मंगेश फरपट
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अखेर संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहेत.
आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
दरम्यान अकोला येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 15 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता बुलडाण्यातही संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

Advertisements
Previous articleपालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटीव्ह; प्रकृती चांगली
Next articleअबे लेका, २०० झाले, आता तं काळजी घे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here