अबे लेका, २०० झाले, आता तं काळजी घे

0
228

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: आपलाच बेफिकीरपणा आपल्याच जिवावर बेतला आहे. बुधवारी, १७ फेब्रुवारीरोजी जिल्ह्यात १९९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. अजूनही आपण बेफिकीर राहिलो तर ही संख्या वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अखेर संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 640 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 199 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 162 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 37 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 271 तर रॅपिड टेस्टमधील 170 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : गिरडा 1, सागवन 1, डोंगरशेवली 1,  चांडोळ 1, कोलवड 1, येळगांव 2, मलकापूर शहर : 16,   दे. राजा शहर : 21, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, अकोला देव 1, सिनगांव जहागीर 13, आळंद 1,   पिंपळनेर 2, अंढेरा 1, सरंबा 1, डोढ्रा 1,  जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, झाडेगांव 1, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 1, एकलारा 1,  सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, चिखली शहर : 32, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, अमडापूर 3, पेठ 1, खैरव 2, दहीगांव 1, सवणा 2, अंचरवाडी 3, तेल्हारा 1, नायगांव 1, खंडाळा मकरध्वज 1,  मंगरूळ नवघरे 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, केळवद 1, मेरा बु 1,  खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, घानेगांव 1, कदमापूर 3, सुटाळा खु 1, मोताळा तालुका : तळणी 1, माकोडी 1,  मेहकर शहर : 2, शेगांव शहर : 8, शेगांव तालुका : गायगांव 2, आडसूळ 1,   मूळ पत्ता हिवरखेड ता. तेल्हारा जि अकोला 3, डोंगरगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 199 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सोमठाणा ता. चिखली येथील 87 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 11, दे. राजा : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 3, सिं. राजा : 4 चा समावेश आहे.
15 हजाराचा आकडा केला पार
जिल्ह्यात आज अखेर एकूण 15225 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14263  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 783 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 179 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.
अशा घालण्यात आल्या आहेत मर्यादा 
मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

Advertisements
Previous articleअखेर बुलडाण्यात संचारबंदी लागू… शाळा महाविद्यालय बंद
Next articleमहाबीजचे एमडी म्हणून जी.श्रीकांत रुजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here