महाबीजचे एमडी म्हणून जी.श्रीकांत रुजू

0
318

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जी.श्रीकांत यांनी 17 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला.
जी. श्रीकांत हे येथे रुजू होण्यापूर्वी लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांनी अकोला येथे सन 2015 ते 2017 पर्यंत जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. बुधवारी रूजू झाल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांसमवेत चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक (प्रशासन), कुचे महाव्यवस्थापक (विपणन), यादव महाव्यवस्थापक (वित्त), शेख व प्रबोध धांदे आदी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleअबे लेका, २०० झाले, आता तं काळजी घे
Next articleअकोल्यात २१ फेब्रुवारीला कडक लॉकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here