अकोल्यात २१ फेब्रुवारीला कडक लॉकडाऊन

0
417

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: नागरिकांच्या बेफिकीरीपणामुळे काेरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अकोला अमरावती जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार आहे. अकाेल्यातील लॉकडाऊनची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषणा केली असून रविवारी, २१ फेब्रुवारीरोजी संपूर्ण दिवसभर अकोल्यात लाॅकडाऊन असणार आहे.
अकोल्यात आज गुरुवारी १२४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दररोजचा आकडा १०० पेक्षा कमी नाही. अशापरिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे बंधनकारक आहे. प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असताना आदेशाचा भंग करणा-यां व्यक्ती, संस्थांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधितांकडून दंड आकारण्यात येत आहे. तरी सुद्धा अकाेल्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेईना. कोविड-19 च्या केसेसमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ढिलाई कामाची नाही. नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्‍टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या नागरिकांनी चेह-यावर मास्‍क, रुमाल किंवा तत्‍सम आवरणांचा वापर करणे बंधनकारक आहे. अशा साधनांचा वापर न करणा-यां विरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच विविध यात्रा,धार्मिक उत्‍सव, लग्‍न समारंभ, वाढदिवस, महोत्‍सव, स्‍नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठक आदी ठिकाणी संबंधित व्‍यवसायिक,मालक,आयोजक यांना सीसीटीव्‍ही लावणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. अशा आयोजनात 50 व्‍यक्‍तींपेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दुकानदार, प्रतिष्‍ठाने, पेट्रोलपंप भाजीपाला, फळ विक्रेते यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्‍याचे दिसल्‍यास त्‍यांच्यावर फौजदारी कलम 144 व मुंबई पोलिस अधिनियम-1951 नुसार गुन्‍हे दाखल करुन दंड वसूल करण्यात यावा असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

Advertisements
Previous articleमहाबीजचे एमडी म्हणून जी.श्रीकांत रुजू
Next articleबुलडाणा जिल्ह्यात वीजेचा थरार, शेतक-याचा मृत्यू तर हरभ-याची सुडी पेटली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here