बुलडाणा जिल्ह्यात वीजेचा थरार, शेतक-याचा मृत्यू तर हरभ-याची सुडी पेटली!

0
273

प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्युज नेटवर्क

बुलडाणा: तांदुळवाडी येथे बाबुराव भाऊराव रिंढे वय ६० वर्षे या शेतक-याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. जिल्हयात सर्वत्र ढगाळ वातावरण असून बुलडाणा, मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
तर चिखली तालुक्यात उतरदा येथे वीज पडून रामेश्वर मनोहर इंगळे यांच्या शेतातील हरभऱ्याची सुडी पेटली. यामध्ये शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतात गहू, हरभरा, पालेभाज्या पीके आहेत. पावसाचे आगमन झाल्यास पिकांची हानी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here