अकोल्यात एकाची हत्या

0
199

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील मोठी उमरी भागातील राष्ट्रीय शाळेजवळ 25 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना 18 फेब्रुवारीरोजी संध्याकाळी 7 वाजता घडली.
गोपाल शिंदे असे युवकाचे नाव आहे. गोपालच्या मोबाईलवर काही संशयास्पद कॉल आढळून आले आहेत. त्यास राष्ट्रीय शाळेतील ग्राउंड मध्ये बोलावून नियोजनबद्ध ठार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या डोक्यावर दगडाने तसेच पोटावर चाकूने वार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकाचा मृतदेह शवविच्छेदन करीता शासकीय रुग्णालयात पाठवला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडावी यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाली असून तपास सुरु झाला आहे.

Advertisements
Previous articleबुलडाणा जिल्ह्यात वीजेचा थरार, शेतक-याचा मृत्यू तर हरभ-याची सुडी पेटली!
Next articleराज्य टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी घेतला कोरोनाचा आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here