राज्य टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी घेतला कोरोनाचा आढावा

0
153

फैलाव रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी- डॉ.सुभाष सोळुंखे
अकोला: जिल्ह्यात होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व रुग्ण संख्या वाढीचा दर ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्गाचा हा फैलाव रोखणे ही प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधी व लोकांची अशी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्व घटकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी दिले.
राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी आज जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा वाढलेला फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

Advertisements
Previous articleअकोल्यात एकाची हत्या
Next articleअकोल्यात विकेंड लॉकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here