अकोल्यात विकेंड लॉकडाऊन

0
154

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार, प्रत्‍येक रविवारी (शनिवारचे रात्री ०८.०० ते सोमवारचे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत) संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्‍यात आले आहे.
या कालावधीत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करता येणार नाही. याशिवाय रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कुठल्‍याही व्‍यक्‍ती, नागरीकांना हालचाल करण्‍याकरिता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता – १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ८.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत सक्‍त मनाई राहील. हे आदेश १८ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्‍यात आले आहेत. शासकीय तसेच खाजगी अॅम्‍बुलन्‍स सेवा, रात्रीच्‍या वेळेस सुरु राहणारी औषधांची दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्‍वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्‍हेट लक्‍झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्‍शा, हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योगातील कर्मचारी व कामगारांना ओळखपत्राचे आधारे जाण्‍या-येण्‍याकरिता परवानगी राहील. आठवडी बाजाराचे ठिकाणी होणाऱ्या गर्दीपासून कोविड-१९ चा होणारा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे अत्‍यावश्‍यक असल्‍यामुळे अकोला जिल्‍हयातील महानगरपालिका सर्व नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रातील या आठवड्यात भरविण्‍यात येणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्‍यात येत आहेत. लग्‍नसंमारंभाकरिता केवळ ५० व्‍यक्‍तींनाच उपस्थित राहता येईल. लग्‍नसमारंभाकरिता रात्री ८.०० वाजेपर्यंतच परवानगी आहे. लग्‍न समारंभाचे ठिकाणी सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक राहील, लग्‍न समारंभ किंवा इतर समारंभाकरिता ५० व्‍यक्‍तींपेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास संबंधीत चालक/मालक/व्‍यवस्‍थापक यांना दहा हजार रुपये दंड तसेच ५० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास प्रती व्‍यक्‍ती दोनशे रुपये यापैकी जी जास्‍त असेल त्‍या प्रमाणे दंड आकारण्‍यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्‍यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांकरिता सिल करण्‍यात येईल. लग्‍नप्रसंगी अथवा कोणत्‍याही कार्यक्रमाच्‍या वेळी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आढळल्‍यास नियमानूसार गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल. आयोजकाने लग्‍नाचे स्‍थळ तसेच किती लोक उपस्थित राहणार आहेत याची माहिती संबंधीत पोलीस स्‍टेशन यांना कळविणे बंधनकारक राहील.
अशी आहेत बंधने …
चारचाकी वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व ३ व्‍यक्‍ती व ऑटोरिक्‍शा वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व २ सवारी यांनाच परवानगी राहील. प्रमाणापेक्षा जास्‍त आढळल्‍यास नियमानुसार दंड आकारण्‍यात येईल. सर्व प्रकारची आस्‍थापना / दुकाने / बाजारपेठ/बार/हॉटेल/ सिनेमागृह/ मनोरंजन उद्याने इत्‍यादी सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुरु राहतील.
शाळा, महाविद्यालयेही बंद
सर्व शाळा व महाविद्यालये , सर्व प्रकारची खाजगी शैक्षणीक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस २८ फेब्रुवारी २०२१पर्यंत बंद ठेवण्‍यात येत आहेत. या कालावधीत ऑनलाईन/दुरस्‍थ शिक्षण यांना परवानगी राहील.

Advertisements
Previous articleराज्य टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी घेतला कोरोनाचा आढावा
Next articleबुलडाणा @271 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here