राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह 400 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

0
904

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट तालुक्यातील कुटासा येथे 19 फेब्रुवारीरोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढणे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच महागात पडले. आमदार मिटकरी यांच्यासह 300 ते 400 कार्यकर्त्यांविरुद्ध दहिहांडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, अकोल्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू हे कालच कोरोना पॉझिटिव्ह आले. मंत्र्यांकडून नागरिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे असताना राष्ट्रवादीच्याच आमदाराकडून नियमांचा भंग करणे कितपत योग्य आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारीच दिले आहेत.

लग्‍न समारंभ किंवा इतर समारंभाकरिता ५० व्‍यक्‍तींपेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास संबधितांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाला दिला होता. असे असतानाही शुक्रवारी दुपारी अकोट तालुक्यातील कुटासा येथे आमदार अमोल मिटकरी यांनी 300 हून अधिक नागरिकांच्या उपस्थितित शिवजयंती सोहळा साजरा करून कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल दिंडोकार यांच्या तक्रारीवरून दहिहांडा पोलिस स्टेशनला आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 400 कार्यकर्त्यांविरुद्ध साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Previous articleबुलडाणा @271 पॉझिटिव्ह
Next articleना . संजय राठोड २३ फेब्रुवारीला पोहरादेवीत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here