संपर्क तपासणी व चाचण्या वाढवा: दीपक म्हैसेकर

0
119

मुख्यमंत्र्यांचे सल्लागारांनी घेतला अकोल्यात आढावा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील कोरोना  संसर्गात वाढ होत आहे, या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राज्यशासनाचे खास दूत म्हणून मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी अकोला येथे भेट देऊन पाहणी केली व जिल्हा प्रशासनामार्फत हाताळण्यात येत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पॉझिटीव्ह रुग्णांचे निकट संपर्क तपासणी तसेच लक्ष्य निर्धारित करुन कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. येता महिनाभर सतर्क राहून ही खबरदारी घेतल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे कोविड विषयक बाबींचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी अकोल्यात भेट दिली. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व अन्य सर्व संबंधित विभागांचा आढावा घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा प्रभारी आयुक्त  पंकज जावळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आंभोरे, डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती  कुलवाल, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी  आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी सादर केला आढावा
जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्ह्यात कोविड विषयक सद्यस्थितीचा आढावा सादर केला. त्यात माहिती देण्यात आली की वाढती रुग्ण संख्या पाहता तालुकास्तरावर तसेच मनपा हद्दीत कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोनची कारवाई सुरु आहे, याबाबत माहिती दिली.
कोविड लसीकरणाचा आढावा
दिपक म्हैसेकर यांनी  विषय व तालुकानिहाय आढावा घेतला.  प्रत्येक गावात लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या लोकांच्या, ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे तेथे कंटेनमेंट झोन तयार करुन त्या क्षेत्रातील सर्व लोकांच्या, सहव्याधी असणारे ज्येष्ठ नागरिक, पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील तसेच त्यांच्या संपर्क साखळीतील लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. दिवसाला किमान २४०० चाचण्या करण्याचे  उद्दिष्ट ठेवावे. ज्या लोकांना होम आयसोलेशन मध्ये ठेवले आहे त्यांना ओळखता यावे म्हणून हातावर शिक्के मारा. त्यांच्या प्रकृतीचे दररोज निरीक्षण व त्यांचेवर औषधोपचाराचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

Advertisements
Previous articleना . संजय राठोड २३ फेब्रुवारीला पोहरादेवीत 
Next articleलॉकडाऊन रिटर्न: बुलडाणा- दुकानांची वेळ आता 9 ते 5

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here