अरे काय चाललंय, बुलडाण्यात आज 301 पॉझिटिव्ह

0
230

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1536 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1235 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 301 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 232 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 666 तर रॅपिड टेस्टमधील 569 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1235 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 56, बुलडाणा तालुका : अजिसपुर 2, सागवान 4, सुंदरखेड 1, माळवंडी 1, शेगांव शहर : 5, खामगांव तालुका : घाटपुरी 1, सुटाळा 1, हिवरखेड 1, वरखेड 1, खामगांव शहर : 23, नांदुरा शहर : 3, चिखली तालुका : उंद्री 3, रायपूर 2, हातणी 1, गुंजळा 1, दहिगाव 1, सोमठाना 6, सावरगाव डुकरे 3, महिमळ 1, पिंपळगाव 1, गजरखेड 1, भोकर 1, रानुबाई 1, मेंडगाव 1, कोलारा 2, चांधाई 1, टाकरखेड 2, पिंपळवाडी 1, अमडापुर 3, शेलुद 1, मुंगसरी 1, अंचारवडी 9, मंगरूळ नवघरे 2, मालखेड 3, खैरव 1, चिखली शहर : 49, मलकापूर शहर : 1, मोताळा तालुका : भोरटेक 3, शेलापुर 1, दे. राजा शहर : 27, दे. राजा तालुका : पिंपळगाव 1, मेहुणा राजा 1, पिंपळनेर 1, किन्ही 1, नगणगाव 2, दे. मही 3, अंढेरा 1, मेहकर तालुका : डोणगांव 2, जानेफळ 9, अंजनी 1, हीवरा 2, मेहकर शहर : 2, सिं. राजा शहर : 2, सि. राजा तालुका : चिंचोली 1, साखर खर्डा 4, किनगाव राजा 2, गरगुंडी 1, लोणार शहर : 19, लोणार तालुका : पिंपळनेर 1, सुलतानपूर 1, वेणी 1, मोताळा शहर : 6,शेगाव तालुका : तिव्हाण 1, भोनगाव 1, जवळा 1, धोलखेड जि. जालना 1, सवासानी जि. जालना 1, अकोट जि. अकोला 2, रामदास पेठ अकोला येथील 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 301 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सवणा ता. चिखली येथील 80 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 94 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 6, अपंग विद्यालय 13, दे. राजा : 14, चिखली : 35, नांदुरा : 2, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 2, मलकापूर : 7, खामगांव : 3, शेगांव : 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements
Previous articleअकोला मनपा, मुर्तिजापूर व अकोट मध्ये आठवड्याचा लॉकडाऊन
Next articleपरत एकदा देऊळ बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here