परत एकदा देऊळ बंद

0
136

फहीम देशमुख
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: विदर्भात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रदूर्भात लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंदिर प्रशासनाकडून रविवारी रात्री कळविण्यात आले.
राज्यात कोरोनाची जणू दुसरी लाट आली असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आजपासून पासून पुढील आदेशापर्यंत गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.

शासनाच्या आदेशान्वये अनलॉक नंतर शेगावच्या मंदिरात अगदी कोरोनाचे नियम पाळत ऑनलाइन पद्धतीने ई बुकिंग द्वारे दिवसभरात फक्त ९ हजार भक्तांना दर्शनासाठी संधी दिल्या जात होती. मात्र आता राज्यात विशेष करून विदर्भात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. यामुळे वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता रविवारी रात्री निर्णय मंदिर प्रशासनाने हा घेतला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद राहणार आहे.
अमरावती विभागात कडक निर्बंध
अमरावती विभागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी उपाययोजनांबाबत सुचना देत आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here