ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना डिस्चार्ज

0
93

मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात घेतला उपचार
प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली होती. पायाला भिंगरी लावून आरोग्यसेवा करतांना त्यांना कोरोनाने गाठलेच.. त्यामूळे त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होता. आज मात्र त्यांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मंत्रिमंडळातील डॉ. राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली. जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. यशोमती ठाकूर यांना बरं नव्हतं. त्या आजारी होत्या. पण सुदैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरीही हे योद्धे पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे.

Advertisements
Previous articleपरत एकदा देऊळ बंद
Next articleऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here