ऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती

0
186
खामगाव न.प.चा उपक्रम, सहभागी होण्याचे आवाहन
व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वच्छ सर्व्हेक्षण स्वच्छ २०२१ अंतर्गत खामगाव न.प.च्यावतीने ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धांचे सर्वेक्षण , आयोजन करण्यात आले आहे . 2021 यामध्ये चित्रकला , पोस्टर , निबंध , रागोळी , जिंगल / पोएत्री , शॉट फिल्म , बेस्ट फॉर वेस्ट अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत . या स्पर्धेकरिता स्वच्छ खामगाव सुंदर खामगाव , कचरा वर्गीकरण व प्रक्रिया , प्लॉस्टीक बंदी , सिंगल युज प्लॉस्टिक बॅन , कोविड -१ ९ सावधगिरी , जागृकता , माझी वसुंधरा , राकाऊपासून टिकाऊ , वृक्षारोपण गरज , जलसंधारणाचे महत्व , स्वच्छ भारत मिशन , होम कंपोस्टींग हे विषय ठेवण्यात आले आहेत . तीन गटात ही स्पर्धा होणार असून वर्ग १ ते ४ थी पर्यंत लहान गट , ५ वी ते १० मोठा गट आणी महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक यांचा खुला गट असणार आहे . ही स्पर्धा निःशुल्क असून कोणत्याही एका विषयावरील कलाकृतीची फाईल उद्या २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत न.प.आरोग्य विभागात सादर करावी.
स्पर्धकांना देण्यात येईल प्रमाणपत्र
या ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता https : // docs.google.com/forms/d/e/1FAIpQL SeOJe9f1xn 19tx74j4ZDJ qh3rZe Ocxixk7tleTAiOAoaQKyQviewform या लिंकवर सहभाग नोंदवावा व गुगल फॉर्मवर DOC , JPEG , PDF . व्हीडीओ , ऑडीओ या फॉरमॅटमध्ये पाठवावे , स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल . तसेच प्रत्येक स्पर्धेतील दोन विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येतील . तरी या स्पर्धामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन न.प.आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .
Advertisements
Previous articleना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना डिस्चार्ज
Next articleकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here