माझी व पूजाची बदनामी करणे थांबवा: ना. संजय राठोड

0
258

तपासातून जे पुढे येईल ते मान्य
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हीच्या आत्महत्याप्रकरणी अखेर वनमंत्री ना. संजय राठोड यांनी मौन सोडले. 14 दिवस मी कुठेच गेलो नव्हतो. माझ्या मुंबईच्या घरीच होतो. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासातून जे पुढे येईल ते मला मान्य राहील असे सांगत माझ्यासह माझ्या कुटूंबाची व पूजा चव्हाणची बदनामी करणे कृपया थांबवा अशी विनंती ना. राठोड यांनी केली.
मागील पंधरवाड्यापासून संपर्काबाहेर असलेले वनमंत्री संजय राठोड 23 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सपत्नीक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी माता जगदंबादेवी, जगद्गुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज, दानशूर बाबनलाल महाराज, राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज समाधी स्थळी माता टेकल्यावर बापूचे उत्तराधिकारी महंत बाबूसिंग महाराज यांचे दर्शन घेऊन चर्चा केली. राठोड म्हणाले, पोलीस प्रशासन जी चौकशी करून सत्य समोर आणेल ते आपणास मान्य राहील. मागील 14 दिवस ते मुंबईतील घरीच होतो. पोहरादेवी येथे दर्शन केल्याने मला जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे याठिकाणी माथा टेकण्यासाठी मी नियमित येत असतो असेही राठोड यांनी सांगितले. पोहरादेवी येथून ते धामणगाव येथे मुंगसाजी महाराज यांचे दर्शनासाठी निघून गेले.

Advertisements
Previous articleवनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला
Next articleआता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here