प्रलंबीत मागण्यांसाठी डॉक्टरचे रुग्णालयासमोर उपोषण

0
601

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : प्रलंबित विविध मागण्यासाठी येथील जिल्हा स्त्री रूग्णालयाचे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी डाॅ हेमंत रत्नपारखी यांनी दिली 23 फेब्रुवारी रोजी रूग्णालयासमोर कुटुंबियांसमवेत एक दिवशीय उपोषण केले.
गत 5 वर्षापासून थकीत प्रलंबित देयके त्वरीत मंजुर करावे , अनियमीत कर्जाची कपात व त्यावरील व्याज नियमीत करावे. कर्जाची परत फेडीबाबत सेवा पुस्तकात योग्य नोंद घेवून त्याची माहिती मला द्यावी. सुट्टीच्या योग्य नोंदी सेवा पुस्तकात घेणे. २०१६ पासुन प्रलंबीत असलेला कालबद्ध पदोन्नतीचा (दुसरा लाभ) प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास त्वरीत त्रुटी काढुन सादर करावा. सेवा पुस्तकाची योग्यवेळी पडताळणी करणे, ७. गोपनीय अहवालात पेरबदल न करेणे. कार्यालयात चालु असलेला मानसिक छळ त्वरीत थाबविणे. झालेले आर्थिक नुकसान व्याजासह देण्यात यावे. १०. सर्व नियमीत कामे सेवा निवृती पूर्वी पुर्ण करण्यात यावे. शासकिय कर्जाची व्याजाची गणणा करून कार्यालयात प्रस्ताव सादर करावा, ह्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जिल्हा स्त्री रूग्णालय अकोलाचे डाॅ हेमंत रत्नपारखी यांनी केली आहे. याकरीता रूग्णालय प्रशासनाविरोधात लेडी हार्डींगसमोर त्यांनी कुटूंबियांसमवेत एक दिवशीय उपोषण केले.

Advertisements
Previous articleशेगाव न प उपाध्यक्षापदी भाजपाच्या सुषमा शेगोकार
Next articleकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रा रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here