कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रा रद्द

0
117
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा-  मौजे पिंपळगांव सराई ता. बुलडाणा परिसरात 25 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर यात्रेमध्ये देशातील अनेक राज्यांतून 5 ते 6 लक्ष भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. सदर यात्रेमध्ये जमणाऱ्या जनसमुदायामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन कोविड 19 या साथरोगाचा फैलाव होवू नये म्हणून सैलानी यात्रा रद्द करण्यात येत आहे. भारतीय साथ रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144, मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील तरतूदींनुसार 25 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत होणारी सैलानी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब या कायद्यांच्या तरतूदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे आदेशात नमूद आहे.
Advertisements
Previous articleप्रलंबीत मागण्यांसाठी डॉक्टरचे रुग्णालयासमोर उपोषण
Next articleपोहरादेवीच्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर, दिला कारवाईचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here