अकोल्यातील 4 अधिका-यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

0
212

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला : पोलिस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षक ते नि:शस्त्र पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या यादी मध्ये अकोल्यातील 4 अधिका-यांचा समावेश असून या मध्ये दोन महीला अधिकारी सुध्दा  आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील 438 अधिका-यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे.

यामध्ये अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलिस अधीक्षक कार्यालय आस्थापनेवरील संग्रामसिंग पाटील, गजाननसिंग बायसठाकुर या 4 अधिका-यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीवर शुभांगी कोरडे-दिवेकर यांची पोलिस प्रशिक्षण येथून जिल्हा जात पडताळणी समिती अकोला, वैशाली आढाव यांची राज्य गुप्तवार्ता येथून पोलीस महासंचालक कार्यालय मुबंई, संग्रामसिंग पाटील व गजाननसिंग बायसठाकुर यांची मुबंई येथे बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथून नरेंद्र देशमुख यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here