पोहरादेवी: 8 ते 10 हजार राठोड समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल

0
104

व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीमः जिल्हयातील मानाेरा तालुक्यातील पाेहरादेवी येथे काेराेना काळात जमाव केल्या प्रकरणी 10 युवकांसह 8 ते 10 हजार अनाेळखी व्यक्तीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे व साथराेग कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार पाेलिस हेड काॅन्टेबलने दिली आहे.
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे वनमंत्री ना संजय राठोड दर्शनासाठी येणार असल्यामुळे मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी 22 फेब्रुवारीला येथील महंत सुनील महाराज यांचे सह इतर महंत यांना कलम १४९ जाफो नुसार नोटीस बजावली हाेती.  जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार 50 इसमापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू नये अशी सुचना केली हाेती. याशिवाय या भागासाठी कलम ३७ ( १ )( ३ ) मुबंई पोलीस कायदा १९५१ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. असे असतानाही ना.संजय राठाेड यांच्या समर्थनार्थ सुमारे 8 ते 10 हजाराचा जमाव पाेहरादेवीत एकत्र आला. ही सर्व परिस्थिती काेरोना संसर्ग पसरविण्यास कृत्यास कारणीभूत  ठरवून जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारल्याने हेड कान्स्टेबल प्रल्हाद शेषराव चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून विनोद रामपाल राठोड, अमित हिरा चव्हाण, राज रामराव राठोड, धीरज विजय राठोड, अर्जुन भिका राठोड,रमेश तुकाराम राठोड, केशव राठोड, आकाश पंडित राठोड,सुधीर अंबादास राठोड,अमित देवेंद्र राठोड,यांचे सह आठ ते दहा हजार अनोळखी इसमांविरुद्ध कलम १८८,२६९,२७० भादवी साथरोग अधिनियमन १८५७ चे कलम २, ३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम १३५ मु पो अधिनियमन नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisements
Previous articleबुलडाण्यात आज 368 पॉझिटिव्ह
Next articleजिल्हा कचेरीत साकारणार ‘ग्रीन बिल्डिंग’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here