जिल्हा कचेरीत साकारणार ‘ग्रीन बिल्डिंग’

0
159

भूसंपादन व पुनर्वसनाची सर्व कार्यालये राहणार एकाच छताखाली
प्रशांत खंडारे 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: कमीअधिक एक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रचंड खर्च होत असल्याने शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असून जिल्ह्याला विकासकामासाठी निधी मिळणे अशक्य ठरत आहे, अश्या प्रतिकूल स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कोट्यवधींची भव्य इमारत उभी राहणार असल्याने विरोधकांचे कान टवकारने स्वाभाविक आहे, पण गव्हर्नमेंट कडून एक कवडीही न घेता ही इमारत साकारणार असेल तर?
होय! जिल्हाकचेरीत हे पर्यावरण पूरक सुखद आश्चर्य लवकरच साकारणार असून त्याला विकासप्रेमी जिल्हाधिकारी एस, रामामुर्ती यांनी मान्यता दिली आहे, हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त पियुषसिंह यांच्याकडे सादर करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे , याला सरकारच्या परवानगीची गरज नसल्याने आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले की लगेचच याचे बांधकामास सुरुवात होणार आहे, यामुळे जिल्ह्याभरातील प्रकल्पग्रस्तांची कामे तात्काळ मार्गी लागून त्यांची अडचण दूर होणार आहे.
साशकीय निधीशीवाय साकारणाऱ्या अश्या प्रकारच्या बहुधा पहिल्या इमारतीची संकल्पना परिश्रमी व अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जाणारे उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन) भूषण अहिरे यांची! त्यांच्या पुढाकाराने जिगाव प्रकल्पग्रस्ताना गत एकदीडवर्षात तब्बल 270 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला, या वाटपापोटी भूसंपादनला नियमानुसार 3 टक्के सेवा शुल्क मिळतो, ही रक्कम 6, 43 कोटी रुपये इतकी होत असून ती इतरत्र खर्च करता येत नाही वा सरकारला परत घेता येत नाही, अशी तरतूद आहे, यामुळे या नुसतेच पडून असलेल्या रक्कमेचा योग्य वापर करतांनाच जिल्ह्याभरातून येणाऱ्या हजारो प्रकल्पग्रस्तांची सर्व कामे एकाच ठिकाणी मार्गी लागावी या उद्धेशाने उप जिल्हाधिकारी अहिरे यांनी ही संकल्पना मांडली, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, मात्र ती सौरऊर्जा आदीनी युक्त पर्यवरण पूरक अशी ग्रीन बिल्डिंग असावी अशी सूचना त्यांनी मांडली.
काय राहणार इमारतीत
दरम्यान या इमारतीत सध्या एसडीओ कार्यालजवळ असलेले जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, जुन्या व नवीन इमारतीत असलेली भूसंपादनची 4 कार्यालये एकत्र नांदनार आहे, त्यात प्रशस्त सभागृह राहणार असून सर्व जुने नवीन रेकॉर्ड, दस्तवैज ठेवण्यासाठी आधुनिक कॉम्पॅक्टर राहणार आहे.

Advertisements
Previous articleपोहरादेवी: 8 ते 10 हजार राठोड समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल
Next articleबुलडाणा जिल्ह्यात आले 368 कोरोना पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here