परभणी जिल्ह्यात प्रवेशबंदी, राज्यातील पहिली जिल्हाबंदी

0
169

व-हाड दूत न्युज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परभणी जिल्ह्यात विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे.
या 11 जिल्ह्यात बसेस तसेच खासगी वाहनाने जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, अचानकपणे प्रवेशबंदीचा नियम लागू केल्यामुळे परभणी तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisements
Previous articleनांदुरा तहसीलच्या ईमारत बांधकामाला मंजूरी, आ. राजेशभाऊ एकडे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleगावात नसतांना गुन्हे दाखल केले: रमेश महाराज यांची तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here