गावात नसतांना गुन्हे दाखल केले: रमेश महाराज यांची तक्रार

0
157

व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: पोहरादेवी जमाव प्रकरणात मी गावात नसतांनाही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले अशी तक्रार रमेश तुकाराम राठोड महाराज यांनी केली आहे. खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी मानोरा ठाणेदार शिशिर मानकर व हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद चव्हाण यांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
पोहरादेवी येथील राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज कुटूंबातील सदस्य असलेले रमेश महाराज यांनी तहसीलदारांना 24 फेब्रुवारीरोजी दिलेल्या निवेदनानुसार, ते 17 जानेवारीपासून बाहेरगावी होते. 23 फेब्रुवारीला औरंगाबाद येथील सिडको बसस्टॅंडवरून जालना करीता जाण्यासाठी ते बसले व तेथून दिग्रस येथे रात्री 8.15 वाजता उतरले. दिग्रसमधून गेवराई बसमधून पोहरादेवीला आले. त्यांच्याकडे या बसचे तिकिट सुद्धा आहे. असे असतानाही 23 फेब्रुवारीला वनमंत्री ना. संजय राठोड पोहरादेवी आले असताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. या आरोपाखाली गावातील 10 इसम व अज्ञात 8 ते 10 हजार नागरिकांवर विविध कलमान्वये हेडकॉन्स्टेबल प्रल्हाद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले. या कार्यक्रमात माझा कुठलाही संबध नव्हता. तरीसुद्धा गोवण्यात आले आहे असे रमेश महाराजांनी म्हटले आहे.

Advertisements
Previous articleपरभणी जिल्ह्यात प्रवेशबंदी, राज्यातील पहिली जिल्हाबंदी
Next articleमी धनश्री निलेश देव अभ्यंकर बोलतेय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here