जी. श्रीकांत यांची औरंगाबादला बदली!

0
411

महाबीजचे नवे एमडी राहुल रेखावार
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
राज्यातील काही आयएएस अधिका-यांच्या बुधवारी संध्याकाळी उशिरा बदल्या करण्यात आल्या. यामध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी गेल्या आठवड्यातच रूजू झालेले जी. श्रीकांत यांचा समावेश आहे. जी. श्रीकांत आता औरंगाबाद विक्री विक्री कर सह आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या जागेवर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राहूल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
जी. श्रीकांत  यांनी 17 फेब्रुवारीला महाबीजला रूजू झाले होते. त्यांनी महाबीजच्या पिशवीसोबत व शेतक-याच्या वेशातील एक सुंदर फोटोही सोशल मिडियावर शेअर करीत आता लक्ष्य महाबीज अशी भावनिक पोस्ट केली होती. महाबीजच्या माध्यमातून रास्त दरात दर्जेदार बियाणे उत्पादीत करण्याचा त्यांनी मानस व्यक्त करीत काही सुचना असल्यास कळवाव्यात असे आवाहनही शेतक-यांसह जनतेला केले होते. 
दृष्टीक्षेपात बदली झालेले इतर अधिकारी 
इतर बदली झालेल्या अधिका-यांमध्ये एल.एस.माली, व्ही. एल. भीमनवार, राहूल रेखावार, डॉ.एच.एस.वासेकर यांचा समावेश आहे. एल.एस.माली सह-सचिव, ग्रामविकास विभाग यांना संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले. तर श्री. व्ही.एल.भीमनवार यांना उपसचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे. श्री. राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर डॉ.एच.एस.वासेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे. श्री प्रजित नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, जव्हार, जि. पालघर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्त केले आहे. यासंदर्भातील आदेश आज संध्याकाळी राज्य शासनाने निर्गमीत केले आहे.

Advertisements
Previous articleमी धनश्री निलेश देव अभ्यंकर बोलतेय!
Next article‘पूजा’साठी श्रद्धांजलीचा सुगंधी हार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here