‘पूजा’साठी श्रद्धांजलीचा सुगंधी हार!

0
253

रचना : अविनाश राऊत

समाजाची तीव्र धार आहे
कायद्यावर ठोस वार आहे
‘पूजा’साठी श्रद्धांजलीचा
एक मोठा सुगंधी हार आहे…

धर्मपीठाचा कारभार आहे
महंतांचा आधार आहे
दर्शन असो वा शक्तिप्रदर्शन
व्यवस्थेवरचाच प्रहार आहे…

आपलंच म्हणे सरकार आहे
पोलिसांना बंधन चिकार आहे
कोंडीतही निघेल पळवाट
नियमांच्या चौकटीस चोर दार आहे…

आरोपांचा ठोसा जोरदार आहे
‘उद्धवा’वरच सारी मदार आहे
विरोधकांच्या घशासही पडेल कोरड
सत्तेपुढं सत्याची बंडी उलार आहे…!

Advertisements
Previous articleजी. श्रीकांत यांची औरंगाबादला बदली!
Next articleएक लोकाभिमुख नेता.. ना. संजय धोत्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here