आमदार रणधीर सावरकर यांनी दिला शेतकरी कुटूंबाला मदतीचा हात

0
251

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: सतत राजकारण आणि समाजकारण यामध्ये सामाजिक दायित्व ठेवून सकारात्मक कार्य करणारे जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांना केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पळसो बढे येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तर प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
विकी ढोके व दीपक घटाळे यांच्या परिवारांना आत्महत्याग्रस्त योजना अंतर्गत राज्य शासनाकडून एक लाख रुपयाचा धनादेशसाठी पाठपुरावा करून मदतीचा हात उपलब्ध करून दिला. या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून दिल्यानंतर तरी आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
सर्वसामान्यांच्या वेदना जाणून केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आपले सहकारी आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे तेजराव थोरात विजय अग्रवाल व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्या सहकार्याने पक्षाच्या विस्तारा सोबत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहतात त्यांच्या या कार्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.

Advertisements
Previous articleएक लोकाभिमुख नेता.. ना. संजय धोत्रे
Next articleरुग्णवाहीकांचे भाडेदर निश्चित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here